सौ. रु. झुं काकाणी कन्या विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सौ. रु. झुं काकाणी कन्या विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मालेगांव (दि. 06 डिसें) - आज सहा डिसेंबर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यालयांमध्ये डॉक्टरांच्या कार्याचे स्मरण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री राजेश परदेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर विद्यालयातील शिक्षिका श्रीमती वैशाली साळुंके मॅडम यांनी सूत्र संचालन करत आपले मनोगत मांडले. कुमारी लावण्या लोधे, गुंजन जाधव, सृष्टी अहिरे किंजल रौंदळ, हेमा घुसर, आदिती देव, संस्कृती वरखेडे, प्रिया पाथरे या 8 वी तील विद्यार्थिनींनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याचे स्मरण केले. श्री जीतेंद्र धनवट सर व श्रीमती पवार यांनी या दिनाचे विशेष औचित्य सांगितले.जेष्ठ शिक्षक  श्री विजय येवले सर व श्रीमती सरोज बागुल .यांनी भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले. श्री एकनाथ अहिरे सर यांनी इंग्रजीतून मनोगत व्यक्त केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा मोरे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात केले. श्री प्रमोद देवरे सर यांनी  आभार मानले.फलक लेखन श्री बागुल कैलास यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने