के.बी.एच. विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

के.बी.एच. विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


मालेगांव : (दि.04 डिसें):- के.बी .एच विद्यालय मालेगांव कॅम्प येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने  दिव्यांग विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण पाटील (आबासाहेब) होते. यावेळी उपप्राचार्य राजेंद्र पाटील, प्रमुख अतिथी अनिल सरोदे (समन्वयक समावेशीत शिक्षण विभाग मनपा मालेगाव), प्रीती पाटील ,दिव्यांग विद्यार्थी विभाग प्रमुख  मिलिंद वाघ, सचिन लिंगायत व्यासपीठावर उपस्थित होते. विभाग प्रमुख मिलींद वाघ  यांनी प्रास्ताविक केले.शिक्षक प्रतिनिधी सचिन लिंगायत यांनी   शासनाच्या दिव्यांगासाठी  असलेल्या योजना तसेच  शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या  साहित्याची माहिती दिली.यात एम.आर.कीट, कॅलिपर , ट्रायसिकल  श्रवण यंत्र आदी साहित्यांचे वाटप तसेच शासनाने दिलेल्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली.

          यावेळी यश निमडे, योगेश सरनाईक  या दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी अनिल सरोदे यांनी महानगर पालिकेच्या वतीने व समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा शिष्यवृत्ती यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे  अध्यक्ष प्राचार्य प्रविण पाटील यांनी  जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच शासनाच्या योजनाची  माहिती देऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजेश धनवट  यांनी केले.आभार राजेंद्र शेवाळे यांनी मानले. कोरोना नियमाचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने