काकाणी विद्यालयाचे माजी विद्यार्थी 'करण बधान' सैन्यदलात 'रडार ऑपरेटर' पदी नियुक्त

काकाणी विद्यालयाचे माजी विद्यार्थी 'करण बधान' सैन्यदलात 'रडार ऑपरेटर' पदी नियुक्त



मालेगाव- (दि. २० डिसेंबर) :- मा.ए.सोसायटी संचलित झुं.प. काकाणी  विद्यालयात शनिवार दिनांक १८ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी  करण गोकुळ बधान  यांची भारतीय सैन्य दलात रडार ऑपरेटर पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा.ए.सोसायटी संचालकांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.  याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री. डॉ. विलासराव पुरोहित यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.सतीषजी कलंत्री उपस्थित होते.  प्रथम सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी करण बधान यांनी आपल्या मनोगतातून सैन्यदलात नियुक्ती होण्यापूर्वी चा अनुभव कथन केला. नियुक्ती झाल्यानंतर नऊ महिने गनर म्हणून ट्रेनिंग घेतली. त्यानंतर झालेल्या परीक्षेत त्यांना गणित विषयात चांगले गुण मिळाले. त्यामुळे त्यांना सैन्यदलात  रडार ऑपरेटर पदी नियुक्ती मिळाली. 



                  याप्रसंगी त्यांनी  विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सैन्यदलात जावे व देशाची सेवा करावी असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री सतीशजी कलंत्री यांनी आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले की आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी करण बधान यांची भारतीय सैन्यदलात नेमणूक झाली ही संस्थेसाठी व आपल्या विद्यालयासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना यातून प्रेरणा घेऊन आपणही या क्षेत्रात चांगले यश मिळवावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या स्थळी संस्थेचे खजिनदार मा. श्री. रामनिवासजी सोनी व संचालक माननीय श्री राजेंद्रभाई अमिन  व संचालक मा. श्री. भोगीलालजी पटेल हे उपस्थित होते. त्याच बरोबर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. शुभांगी अस्मर यांनी केले. यावेळी सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मोरे मॅडम तसेच झुं. प.काकाणी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनिल गोविंद व दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक श्री संदीप दुसाने यांनी केले.  याप्रसंगी जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने