जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) सरळसेवा परीक्षा - २०१९ या जागांसाठी ९८२ पदसंख्याची भरतीप्रकिया जलद गतीने राबविण्यात यावे = राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे मंत्रालय, मुंबई येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) सरळसेवा परीक्षा - २०१९ या जागांसाठी ९८२ पदसंख्याची भरतीप्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावे. मागील ३ वर्षे पासून हि भरती प्रक्रिया प्रलंबित आहे तरी लवकरत लवकर भरती प्रक्रिया राबवावी हि नम्र विनंती महाराष्ट्र राज्य हे प्रगतिच्या दिशेने वाटचाल करत असताना युवकांना नोकरी व सरकारला पुरेशा मनुष्यबळ आवश्यक असते, सध्या सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठ्या प्रमाणात ताण पडलेला आहे. युवक वर्ग हे राज्याची आर्थिक स्थिती सुधारू शकतात.
मागील तीन वर्षे पासून महापरिक्षा पोर्टल द्व्यारे घेण्यात येणारे या भरती परीक्षास शासनाकडून स्थगित देण्यात आली आहे. मधल्या काळात लोकसभा निवडणुक आचारसंहिता, महापूर , विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आणि आता कोरोना या कारणामुळे प्रत्येक वेळी परीक्षा पुढे-पुढे थकली जात आहे, परंतु परीक्षा घेण्यात आले नाही.
या सर्व गोष्टी पाहता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीची वयोमर्यादा निघून जात आहे तसेच मानसिक ताण तणावाला त्रासाला बळी पडत आहेत.माझी आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे तीन वर्षे पूर्वी भरलेल्या फॉर्म ची परीक्षा कोरोना प्रसार कमी झाला आहे त्यामुळे हि परीक्षा तात्काळ घेण्यात यावी, तसेच त्या परीक्षा संबंधी वेळापत्रक जाहीर करावे.
आपल्या स्तरावर विद्यार्थांना सहकार्य होईल अशी आशा व अपेक्षा करतो वरील गंभीर समस्या लक्ष्यात घेता विद्यार्थांनाच्या सोयीसाठी आपण सर्वोत्तपरी सहकार्य करावे अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे , उपाध्यक्ष प्रतीक रायते , गौरेश सूर्यवंशी , सरचिटणीस अनिल गोसावी , शुभम मुरकुटे , निखिल निकम , चिटणीस विशाल लभडे, सागर दराडे , संघटक सचिव अक्षय मोरे , बागलाण तालुकाध्यक्ष प्रीतश भदाणे , निफाड पूर्व तालुकाध्यक्ष प्रमोद कदम आदी उपस्थित होते.