नाशिक जिल्ह्यात ४२ कोरोना पॉझिटिव्ह ; ५५ कोरोनामुक्त, एका रुग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात ४२ कोरोना पॉझिटिव्ह ; ५५ कोरोनामुक्त, एका  रुग्णांचा मृत्यू


 

वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

नाशिक (दि. १९ डिसें) :- बऱ्याच दिवसांनंतर नव्याने आढळलेले कोरोनाबाधित हे कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कमी राहिले. शनिवारी (दि. १८ डिसें) जिल्ह्यात ४२ रुग्णांचे कोरानाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . सद्य : स्थितीत जिल्ह्यात ४२०  बाधितांवर उपचार सुरू आहेत . शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील चोवीस रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील सोळा, तर जिल्हा बाहेरील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मृत बाधित हा नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे . सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९३१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एक हजार ४८१ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने