दिव्यांग एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी मालेगाव तर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.......
मालेगांव -( दि.04 डिसें) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मालेगावातील 27 दिव्यांग बांधवानी रक्तदान करून मालेगावात इतिहास घडवला. जो कधीही विसरता येणार नाही. दिव्यांग असलो म्हणजे आम्ही कमी आहोत किंवा दुर्बल आहोत असा विचार न करता सामाजिक आपुलकी म्हणून दिव्यांग बांधवांनी रक्तदानासारखे श्रेष्ठ दान केले. मालेगावातील काजी शरफुद्दीन हॉल येथे अन्सार रक्तपेढी यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष मुदस्सर रजा, सचिव नईम अहमद, अख्तर हुसेन आणि कार्यकारिणीचे अधिवक्ता एडवोकेट अन्सारी सालिक, इक्बाल सोनल,रियाज मामा तसेच सोसायटीचे दिव्यांग सदस्य उपस्थित होते.
Tags:
नाशिक