प्राथमिक शाळा बंदच, पुढील निर्णय 10 डिसेंबर नंतर - आयुक्त मनपा मालेगांव

प्राथमिक शाळा बंदच, पुढील निर्णय 10 डिसेंबर नंतर - आयुक्त मनपा मालेगांव


मालेगांव (दि. 01 डिसें) : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. मा.शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आरोग्यमंत्री मा.राजेश  टोपे व चाईल्ड टास्क फोर्स यांनी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला होता व या निर्णयाला मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले होते. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार असे चित्र स्पष्ट झाले होते. विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. परंतु साऊथ आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रोन सापडला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला 10 डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली आहे. मालेगांव मनपा आयुक्त मा.भालचंद्र गोसावी यांनी काल हा निर्णय घोषित केला आहे. प्राप्त परिस्थिती बघून पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने