श्री.बळीराम सोनवणे यांना अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार प्रदान- GRP NEWS महाराष्ट्र

 श्री.बळीराम सोनवणे यांना अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार प्रदान


मालेगांव : (दि.01 डिसें) - मा.बळीराम सोनवणे ग्रामविकास अधिकारी बोरदैवत ता. सटाणा जि. नाशिक यांना या वर्षाचा अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश चितळकर, राज्य संघटक ज्ञानेश्वर बागुल, जिल्हाधयक्ष, संतोष जाधव, कार्याधक्ष रफिक सैय्यद, तालुका अध्यक्ष आशिक अली सैय्यद, सचिव शेखर सोनवणे, कार्याध्यक्ष मालेगाव अनवर पठाण या मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम मालेगाव येथे संपन्न झाला. या वेळी  सामाजिक, शैक्षणिक, राजकीय असे  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री.सोनवणे हे तळवाडे गावचे रहिवासी असून सध्या मालेगाव येथे राहतात. या अगोदर  त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मा.राष्ट्रपती महोदयां भारत सरकार नवी दिल्ली यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशा पुरस्काराने सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रध्दा या विषयी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हे कार्य असेच भविष्यात ही चालू राहील असे त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने