नामकरण- कॉलेज स्टॉप नाही आता छत्रपती संभाजी महाराज चौक.......
वैभव सोनवणे/ मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगाव (दि. 01 डिसें) :काॅलेज स्टॉप हा लहान मुलांपासुन तर वयोवृध्दापासुन आवडता चौक आहे. काॅलेज स्टॉपच्या आजुबाजूला शाळा अथवा काॅलेज आहेत त्यामुळे या चौकाला कॉलेज स्टॉप असे नाव पडले होते परंतु हे नाव जुन्या काळी होते.आता हे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज चाैक असे ठेवण्यात येणार आहे; असे उपमहापौर निलेश आहेर यांनी मंगळवारी पार पडलेल्या मालेगाव महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत सांगितले.कॉलेज स्टॉप येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा असा विषय पत्रिकेवर घेतला होता. परंतु या विषयाला विरोध झाल्यामुळे तो विषय तूर्तास थांबविण्यात आला आहे. त्यावर समिती गठीत करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले, त्यामुळे हा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे , परंतु कॉलेज स्टॉपचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असे झाले आहे , यापुढे हा चौक छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन व कार्यातून प्रेरणा मिळणार आहे.