मालेगाव च्या राजकारणातील मोठ्या उलथापालथी ची शक्यता?
वैभव सोनवणे/मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी - मालेगांव : भारतीय जनता पक्षाचे युवानेते मा. डॉ. श्री अद्वय आबा हिरे-पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितचे मा. सभापती तथा संचालक व बारा बलुतेदार संघटनेचे प्रणेते मा. श्री बंडुकाका बच्छाव यांची सदिच्छा भेट घेवून त्यांना भाजपामध्ये प्रवेश करुन सक्रीय सहभागी व्हावे असे निमंत्रण दिले असुन मा. श्री बंडुकाका बच्छाव यांनी डॉ. हिरे-पाटील यांच्या निमंत्रणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तत्पुर्वी बंडुकाका यांनी युवानेते मा. डॉ. श्री अद्वय आबा हिरे-पाटील व मनपा गटनेते मा. श्री सुनिल आबा गायकवाड यांचे ह्दय स्वागत करुन यथोचीत सत्कार केला. याप्रसंगी युवानेते मा. डॉ. श्री अद्वय आबा हिरे-पाटील यांच्या समवेत मालेगांव महापालीकेचे भाजपा गटनेते मा. श्री सुनिल आबा गायकवाड, खाकुर्डीचे मा. सरपंच मा. श्री पवन दादा ठाकरे, युवानेते मा. श्री प्रसाद (लकीदादा) खैरनार यांचेसह भाजपा व बंडुकाका बच्छाव यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.