मालेगाव : भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्यकारिणी जाहीर-GRP NEWS महाराष्ट्र

मालेगाव : भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्यकारिणी जाहीर


वैभव साेनवणे/मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दि .19 नोव्हेंबर) - मालेगांव - मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीची जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. जिल्हा कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भदाणे यांच्या पुढाकाराने युवक जोडण्याचे काम सुरू आहे. जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार, उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, श्याम गांगुर्डे, सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : जिल्हा उपाध्यक्ष महेश दाभाडे, जिल्हा सरचिटणीस कमलेश आहिरे, सरचिटणीस गणेश वाघ, सरचिटणीस अतुल दगा खैरनार, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने