मुख्याध्यापक चंद्रशेखर शेलार यांना राज्यस्तरीय पुरस्कार
मालेगांव: वैभव सोनवणे / मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दि.२१ नोव्हें) :- मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर शेलार यांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने ओझर येथे झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात गुणवंत मुख्याध्यापक म्हणून अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महामंडळाचे अध्यक्ष जे. के पाटील, अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. आर डी निकम, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे गुलाबराब पाटील, साहेबराव कुटे, आर. डी. निकम, राजेंद्र लोंढे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. दरवर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यातून तीन मुख्याध्यापकांना गुणवंत मुख्याध्यापक म्हणून सन्मानित केले जाते. नाशिक जिल्ह्यातून शेलार यांचे सोबत, सिन्नर वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ तसेच उमराणे येथील मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.