नवीन प्राथमिक शाळा किल्ला येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
पुस्तके भेट देण्याचा संकल्प
मालेगांव (दि. 29 नोव्हें) : मालेगांव एज्युकेशन सोसायटी संचालित नवीन प्राथमिक शाळा किल्ला येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. जेष्ठ शिक्षिका सौ. कल्पना सोनवणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर रविंद्र आहिरे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले." महात्मा फुले हे ज्ञानाचा सूर्य होते,त्यांच्यामुळे सर्व बहुजनांना शिक्षणाची दारे उघडी झाली. त्यांनी सुरू केलेल्या स्री शिक्षणामुळेच आज भारत देश महासत्ता होऊ शकतो." असे मनोगत आहिरे सर यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका कविता मंडळ यांनी स्री शिक्षणाचे महत्व विशद केले व आज प्रत्येक घरात ज्योतिबा हवे असे मत व्यक्त केले. मंडळ मॅडम यांनी यावेळी यापुढे प्रत्येक ठिकाणी भेट म्हणून पुस्तके भेट द्यावीत असा संकल्प केला. कार्यक्रमासाठी उपशिक्षिका शोभा आहिरे,अंजली पगारे,रोशनी देवरे तसेच उपशिक्षक चेतन निकुंभ व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.