द्याने-चंद्रमणी नगर येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यान
मालेगांव -(दि. 27 नोव्हें) - गुरू रविदास समता सामाजिक विचारमंच मालेगांव व चर्मकार भाईचारा कमिटी यांच्या सयूंक्त विद्यमाने चंद्रमणी नगर द्याने येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड.वैद्यही भगीरथ उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक केदारे काका व गुरू रविदास समता सामाजिक विचारमंचचे अध्यक्ष दिलीप पाथरे उपस्थित होते तसेच व्याख्याते रविंद्र आहिरे व देविदास सुरंजे उपस्थित होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रस्ताविकेचे पुष्प अर्पण करून सन्मान करण्यात आले. व्याख्याते रविंद्र आहिरे यांनी संविधानाचा प्रास्ताविकाचा अर्थ समजून सांगितला. संविधानामुळे भारत एक अखंड देश आहे व संविधानातील प्रत्येक कायदे व कलमांचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन रविंद्र आहिरे यांनी केले. देविदास सुरंजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी किती कष्ट घेतले व आपल्या देशातील प्रत्येक भारतीयाला समान हक्क व समान संधी कशी मिळवून दिली याबद्दल माहिती दिली. कार्यक्रम ठिकाणी संविधान चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी महिला व तरुण मुले मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदू डावरे,रोहित तेली, दिपक आसान सर, सागर आहिरे, निलेश पवार व सिद्धार्थ वाघ यांनी परिश्रम घेतले.