कृषिमंत्री ना.दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन

कृषिमंत्री ना.दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन....


वैभव सोनवणे/ मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

दाभाडी ता.मालेगांव ग्रामपंचायत अंतर्गत, विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी जवळपास १ करोड निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन तर सुमारे ५१ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

ह्या लोकार्पण व उद्घाटन सोहळयात पायभूत सुविधांसह काँक्रिट रस्ते, पाईप लाईन, प्रवेशद्वार बांधणी, पेव्हर ब्लॉक करणे, सौरदिप बसविणे, सीसीटिव्ही कवरेज करणे, कंपाऊंडिंग करणे, अंगणवाडी बांधकाम यांसह सक्शन मशिन खरेदी करणे, घंटागाडी खरेदी करणे आदि विकास कामांचा समावेश आहे.

ह्या सोहळयात, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, शिवसेना-युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक राजकीय मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने