मालेगाव तालुक्यातील ऊमरदा आदिवासी वस्तीवर 55 ते 60 वर्षापासून लाईट नाही -GRP NEWS महाराष्ट्र

 मालेगाव तालुक्यातील ऊमरदा आदिवासी वस्तीवर 55 ते 60 वर्षापासून लाईट नाही 


वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मालेगाव: गिरणा धरणाच्या निर्मीती पासुन विस्थापीत झालेले आदिवासी बांधव गिरणा धरणाच्या बाजुला वस्ती करून राहत असुन या धरणात यांच्या शेतजमीन घरदार गेल्याने आजपर्यंत आदिवासी गिरणा धरणावर मासेमारी करून पोट भरत होते पंरतु गिरणा धरणाचा ठेका हा परप्रांतीय ठेकेदाराला दिल्यामुळे आज येथील आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे आणि येथील आदिवासींचे एकवेळचे चुल पेटत नाही जवळ जवळ या वस्तीवर ऐंशी ते नव्वद झोपडे असुन येथील आदिवासींना घरकुलाचा लाभ देखील मिळालेला नाही आदिवासी बांधवांना लाईट व घरकुल मिळावे यासाठी दिनांक 29 नोव्हें 2021 वार सोमवार रोजी मालेगाव अप्पर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शेखर पगार, रमेश पवार, सुकदेव दळवी, बळीराम पवार, अशोक दळवी, आत्माराम दळवी, वसंत दळवी, योगेश गर्दे, विष्णु सोनवणे, शुभम भदाणे, भरत सोनवणे, दशरथ मोरे आदींनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने