समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथे संविधान दिनानिमित्ताने ऑनलाइन व्याख्यान संपन्न - GRP NEWS महाराष्ट्र

समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथे संविधान दिनानिमित्ताने ऑनलाइन व्याख्यान संपन्न

रावेर (दि. 27 नोव्हें) सुरेश वाघोदे/रावेर तालुका प्रतिनिधी - भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथे ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर होते. प्रमुख अतिथी प्रा.आशिष गुजराथी होते. व्याख्याते म्हणून डॉ.विजय तूंटे ( विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) हे होते. "भारतीय संविधान आणि सामाजिक जबाबदारी" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.राहुल निकम (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग) यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश समजवून सांगत व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. विजय तुंटे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संविधानाचे महत्व, भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले हक्क आणि अधिकार या बाबत सविस्तर माहिती दिली. श्रोत्यांना संविधानाप्रति त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे स्पष्ट केले. व्याख्याना नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक आणि सविस्तर उत्तर देत शंका निरसन केले.

  या व्याख्यानास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारिवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. राहुल निकम, डॉ.संबोधी देशपांडे (महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग), प्रा.नारसिंग वळवी (कार्यक्रम अधिकारी,विद्यार्थी विकास विभाग) यांनी परिश्रम घेतले. सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारिवृंदांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा.आशिष गुजराथी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.नारसिंग वळवी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने