मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी
मालेगाव (दि. 27 नोव्हें) : मालेगांवतील सोयगाव भागातील पार्श्वनाथ नगर येथील दोन महाविद्यालयीन युवतींचा कॉलेज स्टॉप परिसरात घडलेल्या अपघातात एकीचा दुर्दैवी मृत्यू तर एक तरुणी गंभीर जखमी आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृताचे तरुणीचे नाव देवयानी नंदलाल सुर्यवंशी (वय वर्षे १७) ही असून, अपूर्वा सुधीर शेवाळे (वय वर्षे १८) ही गंभीर जखमी झाली आहे. या दोघी तरुणी कॅम्प भागातून कॉलेज स्टॉपकडे स्कुटीने (MH41J8273) जात असताना ओव्हरटेकच्या नादात HP GAS कंपनीची अँपे रिक्षाला (MH41AT0691) ला धडकल्या. यात देवयानी सुर्यवंशी हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ती जागीच गतप्राण झाली. तर सोबत असणारी अपूर्वा शेवाळे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघात ग्रस्त वाहन पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.