मालेगांवतील विविध शाळेत संविधान दिन साजरा
नितीन पगार/मालेगांव तालुका शहर प्रतिनिधी:
विनय प्राथमिक शाळेत सविधान महोत्सव साजरा
गुरुवर्य बुवा दादा शिक्षण संस्था संचलित विनय मंदिर प्राथमिक शाळेत सविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पाटील सर होते. यावेळी उपशिक्षिका स्मिता पाटील यांनी संविधानाचे वाचन केले तसेच मुख्याध्यापक पाटील सर यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक 23 नोव्हेंबर ते दिनांक 26 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या संविधान महोत्सव उपक्रमाअंतर्गत विनय मंदिर प्राथमिक शाळेत रांगोळी काढणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आले. भारतीय संविधाना बद्दल माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन द्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरे सर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
साने गुरुजी प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा
साने गुरुजी प्राथमिक शाळेत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक खंबाइत सर होते. व श्री राज भोज सर यांनी संविधान विषयी माहिती दिली. तसेच संविधान वाचन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सरस्वती माध्यमिक विद्यालय सायने बु येथे संविधान दिन साजरा
सरस्वती माध्यमिक विद्यालय सायने बु येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत खैरनार सर होते. व श्री बोरसे सर यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले. श्री ढोखे सर यांनी संविधानाविषयी मुलांना माहिती दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
नाशिक जिल्हा