वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण निशुल्क देण्यात यावे- शेख अब्दुल रहीम

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण निशुल्क देण्यात यावे- शेख अब्दुल रहीम


हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांना निवेदन सादर!

औरंगाबाद (दि. 24 नोव्हें 2021) - अनेक दिवसांपासून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रलंबित होतें आज मा.संचालक साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन व  प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या पत्रानुसार आयोजित करण्यात आले आहे याबद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार..! परंतु या प्रशिक्षणासाठी जे फी आकारण्यात येत आहे ही बाब अन्यायकारक आहे. आज अचानक वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तब्बल 2000 रूपये एका शिक्षक प्रमाणे फी घेण्यात येणार आहे,तरी फि न घेता हे प्रशिक्षण निःशुल्क देण्यात यावे म्हणून हा शासन पत्र त्वरित सुधारित करून वरिष्ठ व निवड श्रेणी  प्रशिक्षण शिक्षकांसाठी निःशुल्क देण्यात यावे ही नम्र विनंती. शालेय शिक्षणमंत्री यांनी याकडे स्वतः लक्ष देऊन हा पत्र रद्द करून हजारो शिक्षकांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केली आहे. निवेदनाची एक एक प्रत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण अप्पर मुख्य सचिव साहेब तसेच मा.संचालक साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन व  प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना व्हाट्सएप, इमेल आणि स्वतः कार्यालयात देऊन करण्यात आली आहे. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण सर आदींची स्वाक्षरी होती...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने