शालार्थ आयडीची सक्ती न करता शिक्षक प्रशिक्षण शुल्क माफ करण्याची खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी.

शालार्थ आयडीची सक्ती न करता शिक्षक प्रशिक्षण शुल्क माफ करण्याची खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी


मुंबई -( दि.25 नोव्हे)  : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पत्र काढून बारा वर्षे झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व चोवीस वर्षे झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी रुपये दोन हजार इतके शुल्क आकारले आहे. आज पर्यंत अशा प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलेली नव्हती. राज्यातील विनाअनुदानित , अंशतः अनुदानीत , स्वयंअर्थसाय्यित  शाळांतील शिक्षकांना शालार्थ आयडी नसल्याने हे शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालार्थ आयडीची सक्ती करू नये. राज्यातील सर्व शिक्षकांना नि:शुल्क प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. प्रा. वर्षा गायकवाड मॅडम यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने