आर.बी.एच. कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न - GRP NEWS महाराष्ट्र

आर.बी.एच. कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न

मालेगांव (०१ ऑक्टो २०२१) : आर.बी.एच. कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्या सौ प्रमिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली सोशल डिस्टनसिंगच्या नियमानुसार शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग चालू करण्याच्या दृष्टीने पालक शिक्षक सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील क्रिडा शिक्षक श्री नितीन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. श्री मालपुरे सर आणि श्री गायकवाड सर यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपल्या मनोगतातून सूचना मांडल्या. तसेच उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे यांनी पालकांना मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन सूचना दिल्या. शेवटी अध्येक्षीय मनोगतातून प्राचार्या सौ पाटील प्रमिला यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार विद्यार्थीनींसाठी ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्याचे नियोजन पालकांना सांगितले आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याविषयी पालक आणि शिक्षक यांनी घ्यायची आपली जबाबदारीची जाणीव पालकांना करून दिली आणि विद्यार्थिनींची काळजी घेण्यासाठी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या सौ पाटील प्रमिला, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे व सौ साळुंखे आर जे, पर्येंवेक्षिका सौ शेवाळे पी एस व सौ ठाकरे एल जे, कार्यलयीन अधीक्षक श्री शालिग्राम वाघ, सौ ज्योत्स्ना पाटील, सौ अस्मिता सूर्यवंशी, श्री निवृत्ती बोरसे आणि ठराविक प्राध्यापक व शिक्षक बंधुभगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा बोरसे आणि श्रीमती देवरे शितल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम दुबे मॅडम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने