विध्यार्थ्यांच्या न्याया हक्क साठी मनसे विद्यार्थी सेना तत्पर
विषय:- परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यांचे भाडे माफ होणे बाबत........
मालेगांव (दि. ०१ ऑक्टो २०२१)- वर्ग क आणि वर्ग ड च्या होणाऱ्या आरोग्य भरती च्या परीक्षा ऐन वेळी रद्द झाल्या हा अत्यंत निंदनीय प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, परंतु यात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान व मानसिक खच्चीकरण ही झाले,परीक्षा अचानक पणे रद्द झाल्याने विध्यार्थी नाराज झाले व परंतु येणाऱ्या काळात ज्या क आणि ड वर्ग परीक्षांसाठी विध्यार्थ्यांना जे सेंटर मिळेल तेथे जाऊन व परत घरी येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन मंडळांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बघून संपूर्ण पणे एस.टी. बसेस भाडे माफ करावे. व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालेगाव तर्फे नायब तहसीलदार यांना देण्यात आले त्यावेळे मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विशाल शेवाळे, शहर अध्यक्ष चेतेश आसेरी, कार्याध्यक्ष हर्षल गवळी, शहर संघटक गणेश महाजन, उपशहरअध्यक्ष मुन्ना सूर्यवंशी, बाह्य विधानसभा अध्यक्ष माऊली बच्छाव, किशोर गढरी, मनीष जगताप, निशांत जाधव, सोहम बिरारी, सचिन आहिरे, रोहित साकला, व कार्यकर्ते उपस्थित होते.
