सुरगाणा महाविद्यालयात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांची सदिच्छा भेट-GRP NEWS महाराष्ट्र

सुरगाणा महाविद्यालयात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांची सदिच्छा भेट. 


सुरगाणा (दि.०१ ऑक्टो २०२१) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे आज दिनांक 01 -10 -2021 रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार तसेच उपजिल्हाधिकारी प्रकाश थविल यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया या संदर्भात माहिती जाणून घेतली आणि महाविद्यालयाने राबवलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच कोरोना काळात महाविद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कामकाजाचे कौतुक केले. महाविद्यालयाने आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव देखील त्यांनी केला.

तसेच महाविद्यालयाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या विविध पायाभूत सोयी-सुविधां बद्दल त्यांनी संस्थेचे आणि महाविद्यालयाचे कौतुक केले .जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा आढावा घेतला. तसेच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव देखील केला . यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील  हे सुद्धा उपस्थित होते.                   
तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा व्हि.डि अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा एस. एम. भोये, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने