राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये "प्रेरणादायी नेतृत्व" तयार करण्याची ताकद : प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील

राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये "प्रेरणादायी नेतृत्व" तयार करण्याची ताकद : प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील

मनमाड: (दि. 24 सप्टें 2021) -महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व वृक्ष  जलार्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी कोराना काळामध्ये मोफत मास्क शिवून वाटल्याबद्दल श्री.सुखदेव सोनवणे, श्री.रतन सोनवणे व  श्री.सुनील सरोदे यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लायन्स डॉ.प्रताप गुजराथी हे होते.

त्यांनी आपल्या मनोगतातून, "आपला आहार- आपली प्रतिकारशक्ती" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच जर आपले आहार सकस असेल तर आपले आरोग्यही सुदृढ राहते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.ए.व्ही.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी  श्रमसंस्कार शिबिर अशा उपक्रमशील कार्यक्रमातून  देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी असे गुण फुलवून  स्वयंसेवकांना तत्पर व सक्षम बनवते,तसेच राष्ट्रीय सेवा योजना विविध उपक्रमांतून अंधश्रद्धा निर्मूलन,  समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी जलसंवर्धनासाठी 'कॅच दि रेन' चि सामूहिक शपथ घेण्यात आली. 


या कार्यक्रमात डॉ.पी.बी.परदेशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट सांगताना नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी कृतीशील महाविद्यालयीन तरुणानी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकमधून केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. गणेश गांगुर्डे,आभार प्रा. वर्षाराणी पेडेकर यांनी केले तर  सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु.पल्लवी सोनवणे हिने केले. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांचे सहकार्य लाभले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्रा.ज्योती पालवे,  शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव श्री.समाधान केदारे,  पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका   उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने