कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते तळवाडे येथील समाजिक सभागृहाचे उद्घाटन - GRP NEWS

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते तळवाडे येथील समाजिक सभागृहाचे उद्घाटन 

मालेगांव (दि. 20 सप्टें 2021) कृषिमंत्री ना.श्री. दादाजी भुसे  यांच्या प्रयत्नातून तळवाडे ता-मालेगांव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृहाचे आज मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सर्व स्थानिक पदाधिकारी मान्यवर, ज्येष्ठ नेते, युवानेते, सामाजिक कार्यकर्ते, सन्माननीय समाज बांधव, शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

राजमाता आहिल्याबाई होळकर हे शौर्याचे, त्यागाचे, अनिष्ट प्रथारुढींविरोधात लढा देणारं संघर्षाचे प्रतिक आहेत. त्यांचं कार्य युगे युगे स्मरणात राहून प्रेरणा देणारे आहे. या सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचारांचा सूर्य प्रज्वलित ठेवत एकोप्याने समाजोपयोगी कार्य करावे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने