कित्तीबी प्रबोधन करा! - गुरु रविदास प्रबोधन


     

    कित्तीबी प्रबोधन करा!


कित्तीबी प्रबोधन करा ह्या समाजाचं! 

पण बिल्कुल काहीच परिणाम नाही!


कित्तीबी द्या अंधश्रद्धेचे दाखले पण

डोळस श्रद्धाच लोकांची जागत नाही! 


जसा बोकड मारावा बोकडांसमोर

पण संवेदना एकाचीही जागत नाही!


विज्ञानाची भीती नि अज्ञान प्रीती

स्वार्थी, गबाळवृत्तीला सोडवतच नाही!


गुलाबराव म्हणे शिकूनबी कसे ह्या

समाजाला महापुरुष ते कळत नाही !

       

©️®️गुलाबराव धंजी मोरे, धुळे


गुलाबराव धंजी मोरे,
धुळे


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने