संत रविदासांचे दोहे भाग - ३

संत रविदासांचे दोहे भाग - ३

मन ही पूजा,मन ही धूप!

मन ही सेऊं सहज स्वरूप!!

     उपरोक्त दोह्यातून गुरु रविदास महाराज सामान्य जनतेला उपदेश देताना सांगतात की, आपले मनच पूजास्थान, दीपक व धूप आहे. आपले मन जर पवित्र असेल आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नसेल, राग नसेल,मत्सर नसेल, आपल्या मनात शुद्ध विचार असतील, सद्भाव असेल, इतरांबद्दल करुणा भाव असेल तर आपल्याला प्रार्थना करण्यासाठी मंदिर मध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

      ईश्वर आपल्या मनातच आहे. म्हणून आपले मन आपण नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे हीच ईश्वराची प्रार्थना आहे. एका अर्थाने गुरू रविदास मंदिराच्या नावाने होणाऱ्या कर्मकांडावर टीका करतात व आपल्याला कर्मकांडांपासून लांब राहण्याचा उपदेश करतात.

       आजची परिस्थिती बघितली तर खूप दुःख होते समाज बांधव मंदिरांच्या रांगेमध्ये तासन-तास उभे राहून आपला अमूल्य वेळ वाया घालवताना दिसतात. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा घालतात व आपले धन वाया करतात. मंदिराच्या नावाखाली सामान्य जनतेची भरमसाट लुट होताना दिसून येथे म्हणून आपले मन स्वच्छ ठेवा प्रसन्न ठेवा व ईश्वराला प्राप्त करा हा अमूल्य संदेश आज आपण आचरणात आणूया. 

जय रविदास

शब्दांकन- रविंद्र सुरेश आहिरे
 (संपादक-गुरू रविदास प्रबोधन)


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने