जाति-जाति में जाति है,जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड सके जब तक जाति न जात. - गुरु रविदास।
गुरु रविदासांचे दोहे - भाग २ ![]() |
| गुरु रविदास महाराज |
क्रांतिकारी गुरु रविदास महाराज उपरोक्त दोह्याच्या माध्यमातून समाजातील जातीयतेवर उपदेश देताना सांगतात की, ज्याप्रकारे केळीच्या झाडावरील साल कितीही वेळा काढली तरी झाडावरील सालीच निघत असतात शेवटी पूर्ण झाड संपून जाते परंतु झाडामध्ये काहीच निघत नाही अगदी त्याचप्रमाणे भारतीय समाजामध्ये प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या जातीत विभाजित झाला आहे. हजारो जातीमध्ये विभागल्या गेल्यामुळे मनुष्य एकत्र होत नाही. मनुष्याचे जीवन संपून जाते परंतु ते एकत्र होत नाहीत जोपर्यंत समाजातून जातीयता नाष्ट होणार नाही तोपर्यंत मनुष्य एक होणार नाही. जातीयता व भेदभाव संपणार नाही. समतामूलक समाजाची निर्मिती करताना जात हि खूप मोठी अडसर आहे. आजही भारतीय समाज त्याच प्रकारे जातीजातीमध्ये विभागलेला आहे. म्हणून समाजामध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव दिसून येतो. गुरू रविदास यांना समतामूलक समाजाची अपेक्षा होती म्हणून त्यांनी या दोह्यातून समाजाला जाती जाती विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
![]() |
लेखक-रविंद्र सुरेश आहिरे (संपादक-गुरू रविदास प्रबोधन) |

