सावित्रीची लेक व उपक्रमशील शिक्षिका दिपाली आहिरे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान्

सावित्रीची लेक व उपक्रमशील शिक्षिका दिपाली आहिरे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान..... 



'शिक्षक की गोद मे प्रलय बसता है' या उक्तीप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित सामाजबांधव व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एस.डी. आहिरे यांच्या कन्या उपक्रमशील शिक्षिका सौ. दिपाली आहिरे यांना नुकताच मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या वडिलांच्या प्रेरणेने व त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत दिपाली ताई या शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा व कलागुणांचा ठसा उमटवत आहेत. नांदगाव तालुक्यातील पारधाडी या जिल्हा परिषद शाळेत दिपालीताई या पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गणित मराठी माध्यमकरिता ईयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ई-साहित्य निर्मिती राज्यस्तरीय तज्ञ म्हणून कामकाज, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश व लोकप्रिय शिक्षक म्हणून ख्याती असलेल्या सौ.दिपालीताई यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याचबरोबर दिपालीताई यांना यावर्षी त्यांच्या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीने 'नेशन बिल्डर अवॉर्ड-२०२१' हा अत्यंत गौरवाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिपाली आहिरे यांची राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या वतीने राज्यपातळीवर देखील निवड करण्यात आलेली आहे. अशा विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या नांदगाव तालुक्यातील प्रथम महिला पदवीधर शिक्षिका आहेत. कोरोनाच्या या संकट काळात देखील त्यांच्यातील शिक्षकवृत्ती त्यांना शांत बसू देत नाही. ओट्यावरची शाळा हा उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असतात. संपूर्ण नांदगाव तालुक्यातून त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. दिपालीताईंच्या या यशामुळे त्यांच्या पूर्ण कुटूंबात आनंदाचे व गौरवाचे वातावरण आहे. विशेष करून त्यांच्या वडिलांना आपल्या लेकीच्या कार्याचा अभिमान वाटतो. आपल्या मुलीने तिच्या कार्यामुळे संपूर्ण समाजात आपला सन्मान अधिक वाढवून दिला" असे गौरव उदगार श्री.एस.डी.आहिरे यांनी काढले. 

दिपाली ताई यांनी भविष्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग बहुजन समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे घेऊन जावे हीच अपेक्षा 'गुरु रविदास प्रबोधन' कडून करण्यात येत आहे. दिपालीताई यांना भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने