काकाणी कन्या विद्यालयात शारदोत्सव संपन्न

काकाणी कन्या विद्यालयात शारदोत्सव संपन्न

मालेगांव: (दि.२८ सप्टें)- मा.ए.सोसायटी संचलित सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयात दरवर्षा प्रमाणे नवरात्र शारदोत्सव प्रभात फेरी आयोजन करण्यात आले होते. शारदोत्सव फेरीची सुरुवात पाच कंदील येथून  संस्थेचे खजिनदार श्री. रामनिवसजी सोनी यांच्या हस्ते सपत्निक पूजा करून करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलासरावजी पुरोहित, संस्थेचे चेअरमन ॲड श्री प्रकाशराव दातार, सेक्रेटरी सतिषभाऊ कलंत्री, शालेय समिती चेअरमन ॲड श्री.विजयराव कुलकर्णी,  संचालक भोगीलालजी पटेल , श्री.गोविंदभाऊ तापडिया, श्री.श्रेयसजी काकाणी , श्री शरद  दुसाने,पालक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र वाघचौरे सहसचिव, सौ.नम्रता शाह, श्री बडाळे, सौ शर्वरी बागडे, पाचकंदिल मित्र मंडळ,श्री शरद दुसाने, श्री. अल्पेश बोथरा, मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे मॅडम,पर्यवेक्षक श्री राजेश परदेशी,तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक  व विद्यार्थिनी उपस्थित होते. श्री सुनील चव्हाण,श्रीमती रत्नप्रभा देसले मॅडम यांनी विविध भागांत ढोल पथकासह लेझीम पथकातील सर्व मुलींकडून  लेझीमचे विविध प्रात्यक्षिक करुन घेतले. प्रभात फेरी पाचकंदिल ते  मामलेदार गल्ली, नेहरू चौक ,शास्त्री चौक,मोहनपीर गल्ली,कापसे गल्ली,आझाद चौक,चंदनपुरी गेट, वृंदावन चौक, टिळक रोड,तांबा काटा,गुळ बाजार,किल्ला पोलीस स्टेशन या मार्गाने शाळेत प्रभात फेरी आणण्यात आली. मार्गात अनेक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.रस्त्यावर ठिकठिकाणी सुस्वागतमच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध मंडळातर्फे प्रभात फेरीचे स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या मंडळाकडून विद्यार्थिनींना मसाला दूध व चॉकलेट, पेढे तसेच पिण्याचे पाणी देऊन विद्यार्थिनींचे स्वागत केले.


 आझाद चौकातील देवीची  मुख्याध्यापिका तसेच सर्व विद्यार्थिनींनी आरती केली व जोगवा मागितला. फेरीत ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी  सरस्वती प्रतिमेचे पूजन  केले. फेरीत फुलांचा वर्षाव करून विद्यार्थिनींचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.शाळेत आल्यानंतर शालेय समितीचे चेअरमन अँड श्री. विजयराव कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना व विधिवत पूजा करण्यात आली. पुरोहीत श्री. गिरीश हिंगे यांनी पूजा सांगितली.विद्यार्थिनींनी देवीच्या आरत्या म्हटल्या. या  प्रसंगी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती कालिंदी हिंगे मॅडम ,झुं. प. काकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री तुकारामजी मांडवडे, प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंडळ मॅडम, झुं.प. काकाणी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रमुख सौ शुभांगी अस्मर मॅडम,पालक श्री योगेश येवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्थाचालक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने