स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” आणि “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत मालेगाव वरिष्ठ महाविद्यालाचे विद्यार्थ्यांसाठी ‘लोकशाही निवडणुक आणि प्रशासन ’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
मालेगाव दि. ०५ जुलै २०२२ - मालेगाव सिनियर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय यांच्या विनंती नुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक ४ जुलै, २०२२ रोजी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” आणि “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत मालेगाव महानगरपालिका सभागृहात महानगरपालिकेच्या कामकाजा संदर्भात लोकशाही निवडणुक आणि प्रशासन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरचे भावी नागरीकांना नगररचनाकार विश्वेश्वर देवरे यांनी नगररचना विभागातील लेआउट, झोन, डिपी प्लॅन, परवानगी व इतर महत्वाचे मुद्यांची माहिती दिली तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना डीपी प्लॅन, झोन यांचे कॅटलोग व याबातचे नकाशेही दाखवियात आले. उपायुक्त (मुख्यालय) सुहास जगताप यांनी निवडणुक कामकाजाबाबत माहिती देवून मतदान कोणी करावे ? व का करावे ? तसेच मतदनाकरीता आवश्यक असलेल्या सर्व विहित प्रकिये बाबतची सर्व माहिती दिली. आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची माहिती देतांना महत्वाच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिम, लहान बालकांचे लसीकरण, गरोदर मातांचे लसीकरण व कोवीड-१९ लसीकरण याबाबत सर्व माहिती दिली. तसेव सर्वांनी आपले कोवीड-१९ लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करणेसबंधी सुचना करून याबाबत मार्गदर्शनही केले. मुल्यनिर्धारण व कर संकलन अधिकारी हेमलता डगळे यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी या करांबाबत आवश्यक ती माहिती देवून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणे का आवश्यक आहे याबाबतची सविस्तरपणे माहिती दिली.
उपरोक्त सर्व माहिती दिल्या अंती उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नाचे मनपा प्रशासनामार्फत योग्य ती सविस्तरपणे माहिती देवून निरसण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनपा प्रशानाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाप्रसंगी मनपाचे उपायुक्त सुहास जगताप, मुल्यनिर्धारक व कर संकलन अधिकारी हेमलता डगळे, महिला बालविकास अधिकारी डॉ.श्रिया देवचक्के, नगररचनाकार विश्वेश्वर देवरे, सहा.आयुक्त सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ.सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उद्यान अधिक्षक निलेश पाटील, व इतर अधिकारी कर्मचारी तसेच मालेगाव सिनयर कॉलेजचे प्राचार्य प्रा.जियाऊरहेमान व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
मालेगांव

