सप्तरशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना संरक्षण देऊन दगड फेक करणाऱ्या दोषींवर कारवाही करावी
मालेगाव (दि.१२ एप्रिल) : सप्तरशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना संरक्षण देऊन दगड फेक करणाऱ्या दोषींवर कारवाही करावी याबाबतचे निवेदन भाजपा मालेगाव जिल्ह्या तर्फे अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. सालाबादाप्रमाणे यंदाही पारंपारिक मार्गाने सप्तरशृंगी गडावर भाविक पायी गडावर जात आहेत. नेहमीच निरनिराळी कारणे काढून कधी प्रशासनाकडून तर कधी समाजकंटकाकडून ह्या भाविकांना वेठीस धरले जाते असल्याचा आरोप ह्यावेळी करण्यात आला. काही वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनाकडून सदर भाविकांना पारंपारिक मार्ग बद्लनेस सांगण्यात आले होते तर एके वर्षी भाविकांच्या पालखीना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यास शहरातील भक्तांनी विरोध केला असता नोटीस देने बंद करण्यात आले होते. आणि काल सायंकाळी काही भाविकांवर काही समाज कंटकांकडून दगड फेक करण्यात आली. याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. सदर पायी जाणाऱ्या भाविकांना पोलीस संरक्षण देण्यात येऊन दघडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाही करण्यात यावी व पारंपारिक मार्गाने वाजंत्री वाहन देखील जाऊ द्यावे आदी मागण्यांचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, व्यापारी आघाडी प्रदेश समनव्यक नितीन पोफळे, जिल्हा संघटक सरचिटणीस देवा पाटील, शहर संघटन सरचिटणीस जयप्रकाश पठाडे, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष शाम गांगुर्डे, सांस्कृतिक तालुका अध्यक्ष पप्पू पाटील आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
