मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. रु. झुं काकाणी कन्या विद्यालय, झुं. प. काकाणी विद्यालय, रा क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय व नवीन प्राथमिक शाळा भुईकोट किल्ला येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा
मालेगांव (दि. २६ जाने) : मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचालित काकाणी विद्यालयांमध्ये भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री. विलास पुरोहित यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थिनींसाठी सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन Live प्रसारणाचे घरून पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. R S P व गाईड या विद्यार्थिनींनी ध्वजाला मानवंदना दिली. झुं.प.काकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री.मांडवडे सर यांनी देशभक्तीपर गीत म्हटले तर सतीशजी कलंत्री यांनी आपल्या देशाच्या घटनेने आपल्याला अधिकार दिले आहेत परंतु आपलेही काही कर्तव्य आहे हे विसरता कामा नये अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे तसेच 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट धील फरक कोणता आहे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. पुरोहित यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. विलासराव पुरोहित, व्हा. चेअरमन श्री. राजेंद्रभाई अमीन,सेक्रेटरी श्री.सतीशजी कलंत्री, खजिनदार श्री. रामनिवासजी सोनी, संचालक श्री. गोविंदभाई तापडिया, श्री. भोगीलालजी पटेल, सौ. रू. झु काकाणी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे मॅडम, झुं प काकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुकारामजी मांडवडे, नवीन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कविता मंडळ मॅडम,उपमुख्याध्यापक श्री. चौधरी एन. के. पर्यवेक्षक श्री. परदेशी आर. पी., श्री. गोविंद ए. एम.,प्रशासकीय प्रमुख सौ. अस्मर मॅडम,RSP, गाईड विषय प्रमुख वैशाली साळुंखे मॅडम, शिक्षक पालक संघांचे सहसचिव श्री. योगेश धोंडू येवले. तीनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रीडाशिक्षक श्री. सुनील चव्हाण सर यांनी केले. फलक लेखन श्री. कैलास बागूल, श्रीमती मीनाक्षी पवार यांनी केले.