मालेगावात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके फोडण्यास बंदी- आयुक्त भालचंद्र गोसावी
मालेगांव -(दि.01 नोव्हें 2021) - मालेगांव शहरात रात्री १० ते सकाळी ०६ वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. मागील कोरोना काळात दिवाळी सण फक्त घरातच साजरा होत होता पण आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यास काही प्रमाणात मोकळीक देण्यात आली आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्याने आवाज करणारे फटाके फोडण्यास निर्बंध करण्यात आले. त्यामुळे मालेगांव शहरात रात्री १० ते सकाळी ०६ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्कश आवाज करणारे फटाके फोडण्यास दि. ०४ नोव्हेंबर २०२१ वगळून इतर दिवस मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती महानगर पालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली आहे. तसेच अठरा वर्षाखालील मुलांसोबत पालक असल्याशिवाय त्यांना फटाके विक्री करू नये. व ते फटाके कसे फोडावे हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र, रुग्णालय, शाळा-महाविद्यालय तसेच न्यायालय क्षेत्र या ठिकाणी फटाके फोडण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सर्व लहान- मोठे फटाके विक्रेत्यांनी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केली आहे.