'मिशन कवचकुंडल' अंतर्गत 'काकाणी विद्यालय' येथे लसीकरण मोहीम संपन्न
मालेगांव : (दि. 25 ऑक्टो 2021)- राज्य शासनाने कोरोना निर्मूलनासाठी 'मिशन कवचकुंडल' हाती घेतले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक शाळा व विद्यालयातून देखील लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
मालेगांव शहरातील काकाणी विद्यालय येथे पालकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
ज्या पालकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही व ज्यांनी पहिला डोस घेऊन 90 दिवस पूर्ण झाले परंतु अजून दुसरा डोस घेतला नाही अशा पालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पवार,डॉ.फैहमीदा अलाउद्दीन, लॅब टेक्निशिअन खैरूनिसा सज्जाद अहमद,आरोग्य सेविका सरिता लोखंडे,ज्योती गरुड,राजू बोरसे व आशा वर्कर यांनी ही मोहीम यशस्वी केली. यावेळी झुं.प.काकाणी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.शुभांगी अस्मर,रुं.झुं.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा मोरे व नवीन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता मंडळ मॅडम उपस्थित होते. या मोहिमेसाठी मालेगांव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थाचालकांचा पाठिंबा होता. या लसीकरण मोहिमेला अनेक पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Tags:
नाशिक जिल्हा