सप्तशृंगी देवीचे दर्शन आता ऑफलाइन पासद्वारे-ग्रामपंचायत सप्तशृंगी गड - GRP NEWS महाराष्ट्र

सप्तशृंगी देवीचे दर्शन आता ऑफलाइन  पासद्वारे-ग्रामपंचायत सप्तशृंगी गड

कळवण: दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली आहेत. कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून संपूर्ण प्रार्थनास्थळे बंद होती. कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहेत. महाराष्ट्रातील अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. परंतु दर्शन घेण्यासाठी ई-पास घेणे बंधनकारक करण्यात आले होते. ई-पास काढण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या, यामुळे ग्रामपंचायत सप्तशृंगी गड यांनी कळवण चे आमदार माननीय नितीन पवार साहेब यांना ऑफलाईन पासद्वारे दर्शन सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. माननीय आमदार साहेब यांनी सदर निवेदनाची दखल घेत ऑफलाइन पासद्वारे देवी सप्तशृंगी चे दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. सदर निर्णयामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. या निर्णयाचे ग्रामपंचायत सप्तश्रृंगी गड यांनी स्वागत करत माननीय आमदार नितीन पवार यांचे आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने