लखीमपुर घटनेतील आरोपींवर कारवाई होणेबाबतच्या निषेधार्थ शिवसेना मालेगांवच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन
मालेगांव (दि. 12 ऑक्टो 2021) - उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील चालु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान निदर्शन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या अंगावर क्रुरपणे गाडी चालविण्यात आली. या घटनेत चार शेतकरी बांधवांचे दुर्देवीपणे मृत्यु व अनेक शेतकरी बांधव जखमी झाले आहेत. सदर घटनेतील वाहने केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाच्या ताफ्यातील असल्याने सदर घटनेतील आरोपींना अटक झालेली आहे. परंतु प्रमुख आरोपी आशिष मिश्रा हे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.अजय मिश्रा यांचे चिरंजीव असल्याने सदर घटनेची योग्य चौकशी होणार नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री यांची केंद्रीय मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करुन सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली निपक्षपाती चौकशी करुन सदर घटनेतील मृत शेतकरी व जखमी शेतकरी बांधवांना न्याय देण्यात यावा. त्यामुळे आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आज दि.11/10/2021 वार-सोमवार रोजी महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला आहे.
महाराष्ट्रातील जनताही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजच्या महाराष्ट्र बंदला मिळालेला उस्फृर्त प्रतिसाद आहे. तरी सदर घटनेची सखोल चौकशी करुन तातडीने आरोपींवर कारवाई व्हावी, अन्यथा यापेक्षाही प्रखर आंदोलन महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही.याबाबतचे अपरजिल्हाधिकारी, मालेगांव यांना शिवसेना मालेगांव च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाणे, महानगरप्रमुख रामभाऊ मिस्तरी, ज्येष्ठ नेते मनोहर (बापु) बच्छाव, उपमहापौर निलेश (दादा) आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, मा.उपमहापौर सखाराम घोडके, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, कृउबास उपसभापती सुनिल देवरे, उपमहानगरप्रमुख प्रमोद पाटील, यशपाल बागुल, दत्ता चौधरी, अमोल चौधरी, डॉ. शरद बच्छाव, विभागप्रमुख गणेश पाटील, भारत बेद, राजेंद्र टिळेकर, मुकेश कबिरे, सुभाष चौधरी, युवासेना शाखाधिकारी हर्षल अहिरे, केवळ हिरे, मनोहर ठाकरे, जितेंद्र हयाळीज, संदिप शेवाळे, दिनेश शेवाळे, विजय चौधरी, बापु शिंदे, नितीन झाल्टे, राजकुमार मौर्य, किशोर सोनवणे, साहेबराव बच्छाव, तसेच मातोश्री चालक - मालक संघटना अध्यक्ष व पदाधिकारी, मालेगांव शहर व ग्रामिण शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.