किसान मोर्चाच्या भारत बंदला राष्ट्र सेवा दलाचा पाठिंबा
मालेगाव (दि.२९ सप्टें २०२१) - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या "भारत बंद"ला येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सक्रिय पाठिंबा देण्यात आला. दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी काल 27 सप्टेंबर रोजी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आली. मालेगाव केंद्राच्या वतीने बळीराजाला केंद्र सरकारच्या या तीन काळ्या कायद्यापासून वाचविलेच पाहिजे, या उद्देशाने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आणि नव्याने पारित केंद्रीय कृषी कायदे रद्द करावे ही विनंती निवेदना द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दल मालेगाव महानगर जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, पूर्णवेळ कार्यकर्ते नचिकेत कोळपकर, राजीव वडगे,अशोक पठाडे, योगेश देशावरे, बळवन्त अहिरे, अब्दुल सलिम कुरेशी, प्रवीण वाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
