ना.जयकुमार रावल यांची कृषी विज्ञान संकुल,काष्टी येथे भेट.
मालेगांव दि. 25 ना.दादाजी भुसे साहेबांनी संकुलाची विस्तृत माहिती जयकुमार रावल साहेबांना दिली. ६१७ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात उभारलेले हे कृषी विज्ञान संकुल केवळ मालेगावसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. या संकुलात ५ महाविद्यालये आणि १ कृषी तंत्रनिकेतनाची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी, अन्न तंत्रज्ञान, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी यांसारख्या विषयांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान, रावल साहेबांनी महाविद्यालयांच्या प्रशासकीय इमारती, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे, प्रयोगशाळा, आणि मोठ्या ग्रंथालयाची पाहणी केली.
जयकुमार रावल साहेबांनी या प्रकल्पाचे मनापासून कौतुक केले “छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल" हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी ठिकाण ठरणार आहे. दादाजी भुसे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे या प्रकल्पाची उभारणी झाली आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच यावेळी त्यांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील भेट दिली.