ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कृष्णा डोंगरे

 ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कृष्णा डोंगरे

मालेगांव दि. 13 सामान्य जनता व पोलीस यांचे संबंध अधिक दृढ व्हावे. जनतेच्या मनातील पोलीसांबद्दलची भिती कमी व्हावी यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना संपूर्ण देशभर कार्यरत आहे. समाजात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतात त्यांच्याबद्दल सामान्य जनता भीतीपोटी पुढे येत नाही. अशा लोकांबद्दल पोलीस प्रशासनापर्यंत माहिती पोहचविण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक प्रकाश डोंगळे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदी कृष्णा डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. मालेगांव पोलीस अपर अधीक्षक अनिकेत भारती यांनी कृष्णा डोंगरे यांना पुढील कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने