मालेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन' व मालेगाव वैद्यकीय प्रतिनिधी संघटना" यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन

मालेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन' व मालेगाव वैद्यकीय प्रतिनिधी संघटना" यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन 

केमिस्ट हृदय सम्राट मा. श्री आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या  संयुक्त विद्यमानाने मालेगावात 'मालेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन' व मालेगाव वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. १९/०१/२०२२ रोजी मालेगावात केमिस्ट भवन गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले होते. या कार्यक्रमात मालेगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हाजी खुर्शीद अहेमद ( राजू गाईड ), सचिव श्री. दिलीप पठाडे जिल्हा प्रतिनिधी व कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत जी महाजन तसेच कार्यकारणी सदस्य श्री. श्यामभाऊ पोफळे सहल सेक्रेटरी श्री. सुभाष शेठ पाचपुते तसेच मालेगाव वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे पदाधिकारी मालेगाव युनिट अध्यक्ष कॉम्रेड सुमित पगारे, उपाध्यक्ष कॉम्रेड सुशांत नानकर, तसेच युनिट चे इतर पदाधिकारी कॉम्रेड उमेश वरखेडे, कॉम्रेड श्रीकांत निकम महिला कॉम्रेड स्वप्ना महाले आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास उपस्थित वैद्यकीय प्रतिनिधीना संपाच्या प्रमुख मागण्याचे सविस्तर प्रस्तावना सादर करण्यात आले, व केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित सर्व वैद्यकीय प्रतिनिधी व औषध विक्रेते यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सेवा ब्लड बँक चे विशेष सहकार्य लाभले होते. सेवा ब्लड बँकने रक्तदान करणाऱ्याना संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणात देण्यात आले, उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने